Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्न समारंभातून कोरोनाचा संसर्ग ; नवरदेवाच्या भावाचा मृत्यू, १२ जण पाॅझिटिव्ह

पनवेल (वृत्तसंस्था) पनवेलमधील नेरे गावात लग्नासाठी मोठ्या प्रमाणात जमवलेल्या गर्दीमुळे नवरदेवाच्या भावाचा कोरोना संसर्ग होवून मृत्यू झाला. तर गावातील इतर 12 जण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या संपूर्ण गाव लाॅकडाऊन करण्यात आले आहे.

 

 

नेरे गावातील वामन पाटील यांचा मुलगा जितेश पाटील याने आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा मोठा कार्यक्रम केला. यावेळी तब्बल ४०० ते ५०० लोकांनी हजेरी लावली होती. पाहुण्यांसाठी विशेष मांसाहारी जेवणाची मेजवानी होती. राज्य सरकारचे गर्दी जमवू नये, असे आदेश असतानाही सर्व नियम पायदळी तुडवून दुसऱ्या दिवशी लग्न समारंभातही मोठी गर्दी जमविण्यात आली होती. विशेष म्हणजे एवढे सर्व होत असताना स्थानिक पोलीस, तहसीलदार यांनी कोणीही कारवाई केली नाही. परंतू कोरोनाच्या संसर्ग वाढल्यामुळे गर्दीचे बिंग फुटले. नवरदेवाचा भाऊ जितेंद्र याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर गावातील इतर 12 जण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या संपूर्ण गाव लाॅकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नवरदेव, वडील आणि मुलीचे वडील असे तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version