Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नात हुंडा कमी दिल्यावरून सुनेचा छळ

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरुन तसेच सुनेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, रावेर शहरातील शनी मंदिर कॉलनीत रहीवासी हर्षदा कन्हैयालाल मुलचंदानी (वय-३३) हिच्या लग्नात त्यांच्या वडीलांनी हुंडा कमी दिला. या करणावरुन शहरातील विवाहितेचे सासरे प्रकाश मुलचंदानी सासु मोहीनी मुलचंदानी जेठ कैलास मुलचंदानी जेठानी पार्थना मुलचंदानी यांनी हर्षदा मुलचंदानी हिचा मानसिक छळ करीत असत म्हणून हर्षदा मुलचंदानी हीने देलेल्या फिर्यादी वरुन सासरे,सासु,जेठ,जेठानी विरुद्ध रावेर पोलिस स्थानकात भादवी कलम ४९८ अ ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास एएसआय इस्माईल शेख करीत आहे.

Exit mobile version