Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नात हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ; चार जणाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथील माहेर असलेल्या ३४ वर्षीय विवाहितेला लग्नात हुंडा कमी दिला म्हणून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडील मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

 

सविस्तर माहितीनुसार, शहरातील मेहरूण येथील माहेर आलेल्या यास्मिनबी असदउल्ला खान (वय-३४) यांचा विवाह उसदउल्ला खान हमीदउल्ला खान यांच्याशी २०१४ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. दरम्यान लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरून वारंवार पैश्यांची मागणी केली. परंतू विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने पैश्यांची पुर्तता करू शकले नाही. तसेच दोन्ही मुलीच झाल्या म्हणून काहीना काही कारणावरून शिवीगाळ करणे, दमदाटी करून छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री १० वाजता पती असदउल्लाखान हमीदउल्ला खान, सासरे हमीदउल्ला नसरूल्लाखान, सासू मुमताजबी सर्व रा. परदेशी गल्ली, एरंडोल आणि नणंद यास्मीन साजीद शेख रा. शिरपूर ता. धुळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील हे करीत आहे.

Exit mobile version