लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात महिला नाचतांनाचे व्हिडीओ काढल्यावरून दोन गटात हाणामारी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात महिला व मुली या नाचत असतांना व्हिडीओ काढल्याच्या कारणावरून दोन गटात आपापसात हाणामारी करून एकमेकांना धमकी दिली. तर एकाने हातात तलवार घेवून दहशत निर्माण केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी रविवारी ७ मे रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात अमोल अशोक खैरनार याच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. शनिवारी ६ मे रोजी रात्री ११ वाजता लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात महिला व मुली नाचत होत्या. त्यावेळी अमन हारून बागवान, शाबीर फिरोज पिंजारी यांच्यासह इतर २ ते ३ जणांनी महिला नाचनांचा व्हिडीओ केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राहूल रमेश भोई याने या मुलांना हटकले.  याचा राग आल्याने अमर मागवान, शबीर पिंजारी यांच्यासह इतर आणि दुसऱ्या गटातील राहूल रमेश भोई, गौरव तुकाराम मिस्तरी आणि इतर यांच्या झोंबाझोंबी होवून एकमेकांना मारहाण केली. यातील राहूल भोई याने हातात तलवार घेवून दहशत माजविली. हा प्रकार घडल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली असता दोन्ही गटातील संशयित घटनास्थळाहून पसार झाले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.

Protected Content