Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची हत्या करून तरुणाची आत्महत्या !

चेन्नई (वृत्तसंस्था) लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळील मिंजूर गावात घडली आहे.

 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अवघ्या निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत बुधवारी नितीवासन आणि संध्या यांचा छोटेखानी लग्न सोहळा पार पडला. ते एकमेकांचे दूरचे नातेवाईक होते. परंतू बुधवारी रात्रीच 24 वर्षीय नितीवासन याने आणि 20 पत्नी वर्षीय संध्या हिची हत्या करुन आत्महत्या केली. लग्नाच्या रात्री नातेवाईकांना संध्याचा आरडाओरडा ऐकू आला. त्यांनी खोलीचे दार ढकलून उघडले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तर पती नितीवासन हा बेपत्ता होता. नातेवाईकांनी नितीवासनचा शोध सुरु केल्यावर त्याचा मृतदेह जवळच एका झाडाला लटकलेला आढळला. दरम्यान, हत्या आणि आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Exit mobile version