Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार, अपत्य झाल्यानंतर लग्नास नकार ; डॉक्टर विरुद्ध गुन्हा

सांगली (वृत्तसंस्था) सांगलीतील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने लग्नाच्या भूलथापा देऊन एका तरुणीवर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर, अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तरुणीला अपत्य झाल्यानंतर त्याने चक्क लग्नास नकार दिला. अखेर पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज पाटील (रा. निंबवडे, ता. आटपाडी) असे आरोपीचे नाव आहे.

 

 

सांगलीतील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील पृथ्वीराज पाटील हा एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयातील नर्सिंग विभागात पीडित तरुणी शिकते. दोघांची मैत्री झाली. कालांतराने दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पृथ्वीराज पाटील याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्रामबाग परिसरात तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीला अपत्यही झाले. त्यानंतर मात्र, त्याने तिला लग्नास नकार दिला. फसवणूक आणि लैंगिक अत्याचार झाल्याने पीडित तरुणीने रविवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, पृथ्वीराज पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.

Exit mobile version