Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला ही दोन मुलींसह वास्तव्यास आहे. पतीचे सन २००५ मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे महिला ही घरगुती मेस चालवून आणि लेडीज गारमेंटसचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दरम्यान, श्रीकृष्ण तुकाराम मेगंडे (वय-४०) रा. अयोध्या नगर, जळगाव याची मेसमध्ये जेवणासाठी येत असतांनामहिलेची ओळख निर्माण झाली. २३ मार्च २०१७ ते ३० मे २०१९ दरम्यान संशयित आरोपी श्रीकृष्ण मेगंडे याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्ती अत्याचार केला. तसेच काहीना काही कारण सांगून तिच्याकडून पैसे घेत होता. आत्तापर्यंत संशयित आरोपीने महिलेकडून १९ लाख १० हजार रूपये वेळोवेळी उकाळले आहे. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलने न्यायालयात धाव घेतली. अखेर बुधवारी ८ मार्च रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेगंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Exit mobile version