Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लक्षणं नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही : राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत तर कुणाचीही चाचणी करण्याची गरज नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

 

राजेश टोपे पुढे म्हणाले की, प्रत्येक प्रकारच्या तक्रारीकडे सरकारचे बारकाईने लक्ष आहे. परंतू येणाऱ्या काळात आपल्याला करोनासोबतच जगायचं आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेऊनच आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे. अगदी मंत्रिमंडळ बैठक, वर्धापन दिन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. तर लक्षणं नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version