Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी गणरायाचे विसर्जन उत्साहात

 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, दुध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे, डॉ प्रांजल खेवलकर, चि. समरजित, कु.सारा यांच्या सह परिवारातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी एकनाथराव खडसे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. याप्रसंगी रोहिणी खडसे यांनी ढोल वाजवून मिरवणुकीत सहभाग घेतला. याप्रसंगी गणरायाला निरोप देताना रोहिणी खडसे आणि परिवाराने गणरायाचे मनोभावे पुजन केले व राज्याच्या काही भागावर असलेले अतिवृष्टीचे संकट तर काही भागावर असलेली दुष्काळाची छाया आणि पशुधनावर आलेल्या लंपी आजाराचे विघ्न दुर कर व सर्वांना सुखकारक निरामय आयुष्य लाभू दे अशी रोहिणी खडसे यांनी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केली.

Exit mobile version