Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोहिणी , एकनाथरावांच्या प्रयत्नांनी ४ गावांना सीएसआर निधीचा लाभ

मुक्ताईनगर प्रतिनिधी  । मुक्ताईनगर मतदार संघातील ४ गावांना इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सीएसआर अंतर्गत विविध विकास कामांसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे व अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या प्रयत्नाने चार गावांना प्रत्येकी ७५ लक्ष असा एकूण ३ कोटींचा निधी मिळणार आहे. 

 

या विकास कामांमध्ये बोदवड तालुक्यातील कोल्हाडी तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी, सालबर्डी व रुईखेडा या गावांची नावे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. येत्या ८ जुने रोजी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची ७ सदस्यीय कमेटी सदर गावांना भेटी देणार असून पाहणी दौरा करणार आहे. त्यांच्या बरोबर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर या उपस्थित राहणार आहेत. याबाबत एकनाथराव खडसे यांचे स्विय सहाय्यक योगेश कोलते यांनी माहिती दिली.  सदर सीएसार निधी अंतर्गत शैक्षणिक, स्वच्छता तसेच दिवाबत्ती व विद्युतीकरणाच्या विविध विकास कामांचा समावेश करण्यात येणार आहे.  त्यामध्ये सोलर अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सोलरवर करणे, हायब्रीड एलईडी ६० व्हॅटचे २५ फुटांच्या पोल सोबत ७० नग, ३५ फुटांच्या पोल सहीत ३ हायमास्ट लाईट, पाण्याचे पंपिंग हाऊस सोलरवर करणे,  जिल्हा परिषद शाळांना सोलारवर करणे. शैक्षणिक विकास कामांमध्ये प्रत्येक शाळेत आरो फिल्टर व २००  लिटरच्या वॉटर कुलर,  स्टुडन्ट कीट (एक्शनचे स्पोर्टशूज, सॉक्स, रेनकोट, वॉटर बॅग, स्कूल बॅग स्वेटर), शाळेचा एक वर्ग डिजिटल करणे, सॅनिटरी नॅपकिन चे वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविणे, इंडोर व आउटडोर गेम्सचे साहित्य तसेच ओपन जिमचे साहित्य उपलब्ध करणे, पोर्टेबल फायबर टॉयलेट बसवणे.  स्वच्छता विकास कामांमध्ये प्रत्येक घरात ओला व सुका कचऱ्यासाठी दोन कचरा कुंड्या, सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी मोठ्या कचराकुंड्या, टाटा अॅस कंपनीची घंटागाडी, २० एचपी जे कंपोस्ट पीट क्रशर, सार्वजनिक ठिकाणासाठी फायबरच्या मुताऱ्या, ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सोलरवर चालणारी सार्वजनिक पिठाची गिरणी अशा कामांचा समावेश आहे. या सीएसआर निधी मध्ये जी कामे कोणत्याही ग्रामीण भागात कधीही पाहिली नाही ती या निधी मधून होणार आहेत ज्यामुळे गावाचा चेहरा मोहरा तर बदलणारच असून ग्रामस्थांचे राहणीमान उंचावण्यास खूप मोठी मदत होणार आहे. सीएसआर निधी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या कामांमुळे विजेची खूप बचत होऊन ग्रामपंचायतचे वीज  बिल कमी होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील जि.प.शाळांमध्ये शहरी भागातील इंग्लिश मेडियम शाळांसारख्या सुविधा उपलब्ध होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे. यातून ‘स्वच्छ व सुंदर गाव’ या संकल्पनेनुसार गावाचा विकास होणेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

 

Exit mobile version