Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोटरॅक्ट क्लब खामगावद्वारे गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्री 

 

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दरवर्षी रोटरी क्लब खामगांव पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जोपासत पर्यावरणपूरक शाडू मातीव्दारे बनविलेल्या गणपतीच्या मूर्तीचे प्रदर्शनी व विक्री करीत असतात. परंतु यावर्षी रोटरी क्लब खामगांवच्या मार्गदर्शनात रोटरॅक्ट क्लब खामगांबद्वारे गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्री माटी के गणेश सिजन ५ चे आयोजन करण्यात आलेले आहे.

शाडूच्या मातीचे गणपती पाण्यात लवकर विरघळतात परंतु प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्या पाण्यात विरघळत नाही आणि पर्यायाने निसर्गाचा समतोल बिघडतो. आपल्या नैसर्गिक जलस्रोतांना आपणास स्वच्छ ठेवायचे असेल तर मूर्तीचे विसर्जन विहीर, नदी किंवा तलावात न करता घरच्या घरी बादलीत करून ते पाणी बागेत किंवा कुंडीत टाकू शकतो. समाजासमोर एक सकारात्मकता ठेऊन आपण हा मुद्दा जर जगासमोर आणला तर निश्चितच एक क्रांतिकारक परिवर्तन घडेल. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्या स्वस्त मिळतात तर शाडूच्या मातीच्या मुर्त्या महाग मिळतात.

जनतेचा कल प्लास्टर ऑफ पॅरीसकडे जास्त असतो. मातीच्या गणेशाची स्थापना घरोघरी होईल हा उदात्त दृष्टीकोन लक्षात ठेऊन रोटरॅक्ट क्लबने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर श्रींच्या मूर्तीची विक्री आयोजित केलेली आहे.

सदर विक्रीचा स्टॉल मोहन मार्केट (जुनी मोहन टॉकीज) येथे २६ ते ३० ऑगस्ट या दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. श्रींच्या मातीच्या मूर्ती नागरिकांनी घरोघरी स्थापित कराव्यात व पर्यावरणाचा समतोल साधावा, असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष आलोक सकळकळे, सचिव रितेश केडिया, रोटरॅक्ट समन्वयक विजय शर्मा, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष प्रसाद मुळीक, सचिव अँड निखील आहुजा, प्रकल्पप्रमुख सुमित डिडवाणीया ( मो नं ९०२८६७९३३०), सहप्रकल्प प्रमुख हिमांशू भगत ( मो नं ८३७९०४०९०७) यांचेसमवेत रोटरी आणि रोटरॅक्ट क्लबच्या अनेक सदस्यांनी केले आहे.

Exit mobile version