Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे कोरोनाच्या कालावधीत रोजगार बुडालेल्या व निराधार सात महिलांना शिलाई मशीनचे वाटप नगरसेवक अनंत जोशी यांच्या हस्ते ओंकारेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले. 

नगरसेवक अनंत जोशी यांनी सांगितले की, उपक्रमामुळे गरजू महिलांच्या हाताला काम मिळणार असून त्यांना कपडे शिलाई कामातून घरबसल्या रोजगार उपलब्ध होईल. कोरोनाच्या कालावधीत दवाखान्यातील खर्चामुळे रुग्णांचे कुटुंब कर्जबाजारी झाले बर्‍याच महिलांचा सुद्धा रोजगार बुडाला. त्यामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्ज फेड व मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्‍न निर्माण झाला. आता या महिला कपडे शिवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकता. या उपक्रमाच्या माध्यमातून सात महिलांच्या कुटुंबाला नवसंजीवनी लाभणार आहे. कोविडच्या कालावधीत राबवलेल्या या उपक्रमामुळे समाजात चांगला संदेश जाईल. दरम्यान, रोटरी जळगाव रॉयल्स व या उपक्रमांची माहिती अध्यक्ष स्वप्निल जाखेटे यांनी दिली. भविष्यातही निराधार महिलांच्या रोजगारासाठी आणखी काही शिलाई मशीनचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महिलांनी या मशीनचा योग्य उपयोग करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. या कामातून मिळणार्‍या पैशांमुळे कुटुंबाचा आर्थिक भार हलका होण्यास मदत होईल, असे मत सुधा काबरा यांनी व्यक्त केले. सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्‍वासन या प्रकल्पाचे प्रायोजक, डिझाइन कन्सेप्टचे गोविंद वर्मा यांनी दिले. समाजाभिमुख उपक्रमांवर अधिक भर देण्यात येईल, अशी ग्वाही प्रोजेक्ट चेअरमन शरद जोशी यांनी दिली. सूत्रसंचालन मानद सचिव सचिन जेठवाणी यांनी केले. तर जनसंपर्क प्रमुख विजय लाठी यांनी आभार मानले. या वेळी जुगल जोशी, डॉ.जयदीप छाबडा, भरत पटेल, अमृत पटेल, सचिन खडके, पिंकी मंधाण, नारायण लाहोरी अनिल आडवाणी आदी उपस्थित होते.

Exit mobile version