Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या अध्यक्षपदी डॉ. बाळकृष्ण पाटील

पाचोरा, प्रतिनिधी ।  रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगावच्या  दिशा डेंटल क्लिनिक येथे घेण्यात आलेल्या बैठकीत  नूतन अध्यक्ष म्हणून रॉट. डॉ. बाळकृष्ण पाटील तर नूतन सचिव म्हणून रोट. डॉ. पंकज शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

रोटरी क्लबचे उपप्रांतपाल रोट राजेश मोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या  या बैठकीत रोटरी क्लबचे अध्यक्ष रोट. डॉ. प्रशांत पाटील यांनी गतवर्षाच्या कार्यकाळातील उपक्रमांची उजळणी सदस्यांना करून दिली.  यावेळी उपप्रांतपाल रोट. राजेश मोर यांनी रोटरी क्लबच्या आधारभूत सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली. नूतन वर्षाच्या पदग्रहण समारंभा बाबतचे नियोजन व संचलन या बाबत रोटेरियन राजेश मोर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत रोट. शैलेश खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष रोट. डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी आगामी वर्षाचे प्राथमिक नियोजन व नियोजित उपक्रम बाबतचा आराखडा सदस्यांसमोर मांडला. क्लबचे सचिव रोट डॉ. अमोल जाधव यांनी आभार मानले.  वर्षपूर्तीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला रोट. डॉ. गोरख महाजन, रोट. शिवाजी शिंदे, रोट. डॉ. स्वप्निल पाटील, रोट. अतुल शिरसमणे, रोट. डॉ. पवन पाटील, रोट. डॉ. वैभव सूर्यवंशी आदी सदस्य उपस्थित होते.

 

Exit mobile version