Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोटरी क्लब चोपडातर्फे एसटी बस चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर

 

चोपडा, प्रतिनिधी ।रोटरी क्लब चोपडातर्फे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करतांना दीडशे बस चालकांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर श्री गणेशा नेत्रालय,पाठक गल्ली, येथे नुकतेच पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन डॉ. दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ. सचिन कोल्हे व संदेश क्षीरसागर उपस्थित होते.
कोरोना काळानंतर एसटी बस सेवा सुरू आली आहे. त्यात एसटी बस चालकांची भूमिका ही महत्वाची व जबाबदारीची असल्याकारणाने रोटरी क्लब चोपडाने बस चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केल्याचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी सांगितले.  शिबिर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सचिन कोल्हे यांचा मार्गदर्शनात पार पडले. तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले. “सध्याच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे पसरत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास याचे परिणाम शरीरावर होतात. मात्र, याचा मोठा फटका बसतो तो डोळ्यांना. डोळ्यांच्या आतील नेत्र-पटलावर म्हणजे रेटीनावर देखील मधुमेहाचे दुष्परिणाम होऊन पूर्णपणे अंधत्त्व येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वेळीच निदान होऊन त्यावर उपचार होणे गरजेचे असते, असे डॉ. दिपक पाटील यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी रोटरीचे पंकज बोरोले, प्रवीण मिस्त्री चंद्रशेखर साखरे, प्रफुल्ल गुजराथी, एम. डब्ल्यू. पाटील, अनिल अग्रवाल व श्री गणेशा नेत्रालयाचे सदस्यांनी कामकाज पहिले. तर रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर योगेश भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version