Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोजगार मेळाव्यात 699 उमेदवारांची झाली प्राथमिक निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 11 मार्च, 2023 रोजी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी, जळगाव व प्राचार्य डॉ. जी. एम. माळवटकर यांचे प्रमुख उपस्थितीत पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाला.

 

या मेळाव्यात एकूण दहा औद्योगिक/खाजगी आस्थापनांनी १० वी पास/ १२ वी पास, आयटिआय., डिप्लोमाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. या मेळाव्याचा एकूण 715 उमेदवारांनी लाभ घेतला. विविध आस्थापनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मुलाखती दिल्यात. त्यापैकी एकूण 699 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून अंतिम निवडीची कार्यवाही उद्योजकांचे स्तरावर सुरु आहे. अशी माहिती वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version