Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

यावल,  प्रतिनिधी | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावलच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात कार्यरत रोजंदारी वर्ग३/४कर्मचारी यांनी  प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने मंगळावर दि. १२ ऑक्टोबर पासून उपोषणाचा इशारा प्रकल्प कार्यालयाला निवेदनाद्वारे दिला आहे.

 

आदिवासी  विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मागील दिड वर्षापासुन कोरोना विषाणु संसर्गाच्या संकट ओढवल्याने सदर रोजंदारी कर्मचारी हे बेरोजगार झालेला आहै,कारण आदिवासी विभागाला गेल्या अनेक वर्षापासुन अल्पमानधनात सेवा देत आलेले आहेत,मा.आयूक्त साहेबांच्या आदेश असतांना ही त्यांना फक्त परीपत्रक काढुन ही सन २०२०-२१ मध्ये कामावर घेण्यात आले नाही.आता या बेरोजगार कर्मचाऱ्यांनी आपले जिवन  जगाव कस?हा मोठा  प्रश्न त्यांच्यासमोर येऊन ठेपला आहे.विकास  प्रकल्प कार्यालयाच्या वतीने २० आॅगष्ट रोजी दिलेल्या आश्वसनाच्या पत्रान्वये कर्मचारी यांनी आपले नियोजीत आमरण उपोषण स्थगित केलेले होतै.त्यावर अद्याप कुठलीही ठोस निर्णय किंवा कार्यवाही प्रकल्प कार्यालयाने केली नसल्याने आज प्रकल्प कार्यालयाला यावल प्रकल्पातील रोजंदारी वर्ग ३/४ कर्मचारी हे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी यावल येथे आमरण उपोषणाला प्रकल्प कार्यालयासमोर बसणार आहेत. आश्रमशाळेतील कर्मचारी व त्यांच्या विविध मागण्या पुढीलप्रमाणे ( १) मागील शैक्षणिक वर्ष२०२० -२१चे मागविलेल्या प्रस्तावाच्या दिनांकान्वये आदेश निर्गमित करुन मानधन अदा करण्यात यावे.( २ ) सन२०२१ते २o२२ मध्ये सर्व रोजंदारी कर्मचारींना शाळा व वसतिगृहावर हजर करावे.( ३ )वर्ग-४ कर्मचारींना सार्वजनिक बांधकाम विभाग जळगांव यांचा कुशल अकुशल नविन दराप्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात यावेत ( ४)मा.मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशानुसार हातावरचे पोट असणाऱ्यांना लाॅकडाऊन काळातील सरसकट मानधन अदा करण्यात यावे. निवेदनावर प्रकाश पाटील,जितेंद्र गुरव,अल्लाउद्दीन तडवी,जहांगीर तडवी,जितेंद्र पावरा,रविकुमार बारेला,असलम तडवी,मुबारक तडवी,विनोद तडवी,श्रीम,संगिता डुडवे,तुकाराम बारेला,राजेंद्र धुंदले,कुरबान तडवी,कृष्णा बारेला,श्रीमती तनुजा तडवी आदिंच्या स्वाक्षरी आहेत.

 

Exit mobile version