Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘ रोखठोक ” सदरातील टीका चंद्रकांत पाटलांना झोंबली !

मुंबई : वृत्तसंस्था । जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत. एवढ्या वर्षानंतर या जगामध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले असून त्यांच्याकडे फक्त भारतातल्या व महाराष्ट्रातल्या नाही. तर संपूर्ण जगातल्या विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला

. संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. पुण्यातील बोपोडी येथील एका कार्यक्रमास चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमास आले होते. त्यानंतर त्यांनी प्रश्नावर भूमिका देखील मांडली.

बेळगाव येथील गावाचा समावेश महाराष्ट्रामध्ये करण्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, तेथील अनेक गावात कन्नड भाषिक अधिक आहेत. ती गावं स्वाभाविकपणे कर्नाटकमध्ये गेली आहेत. अशी ८०० गावं आहेत. त्यामुळे बेळगावसहित ८०० गावं महाराष्ट्रात आली पाहिजेत. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, असं पाटील म्हणाले.

भाजपावर टीका करणं, ही संजय राऊत यांची ड्युटी आहे आणि ते आपली ड्युटी योग्यपणे पार पडत आहेत. मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही, त्यांना लगेच टोचतं ! तसेच शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं.

Exit mobile version