Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेशन धान्य वाटपाचा भोंगळ कारभार, चौकशीची मागणी; अल्पसंख्यांक सेवा संघाचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पुरवठा विभागच्या भोंगळ कारभारामुळे लाभार्थी वंचित राहत असून बारा अंकी नंबरचा घोळ होत आहे. हा भोंगळ कारभार आणि घोळ संदर्भात चौकशी समिती नेमावी अशी अल्पसंख्यांक सेवा संघाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात स्वस्त धान्य दुकानदारांच्या भोंगळ कारभा सुरू आहे. शासनाने कोरोना काळात लॉकडाऊन घोषीत केले. यात शासनाने लाखो टन धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना वितरीत करण्यासाठी दिला होता. पण अल्पसंख्याक सेवा संघटनेने केलेल्या सर्वेनुसार स्वस्त धान्य दुकानदारांनी शेकडो लाभार्थ्यांचा धान्य उचल करून परस्पर विल्हेवाट लावल्याचे दिसून येत आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी व तत्काळ चौकशी समिती नेमण्यात यावी. तसेच विशेष बीपीएल व केशरी कार्डधारक यांचीही पिळवणूक होत आहे. यात बारा आकडी नंबरचा मोठा घोळ होत आहे. बारा आकडी नंबर नसेल तर धान्य दिले जात नाही. होणाऱ्या या घोळ संदर्भात चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अन्यथा अल्पसंख्याक सेवा संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

या निवेदनावर प्रदेशाध्या जहांगिर खान, जिल्हा महिला अध्यक्षा आयेशाबी मनियार, प्रदेशउपाध्यक्ष याकुब दाऊद खान, ग्रामीण तालुकाध्याक्ष गुलाम मिर्झा, भावना लोढा, रईदाबी पटेल, सलीम इनामदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version