Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची चौकशी करा; भाजपाची मागणी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी दुपारी दोन धान्य गोदाम सिल केल्यानंतर चौधरी ट्रेड्सला महसूल विभागातर्फे नोटीस दिली जाणार आहे. अशी माहिती तहसिलदार बंडू कापसे यांनी सांगितले. दुपारीकडे तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड असल्याने कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे

मध्य प्रदेश राज्य शेजारी असल्याने रावेर परिसरातुन मोठ्या प्रमाणात रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड आहे. त्यातच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे एकच खलबळ उडाली आहे. आज महसूल विभागातर्फे चौधरी ट्रेड्सला नोटीस बजावण्याचे हालचाल सुरु होती. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाईत चौधरी ट्रेड्सच्या गोदामामध्ये २०८ तांदळाचे कट्टे, ९७ कट्टे गहु तर ११ ज्वारी कट्टे आढळले. दुसरीकडे शेख नयूब शेख़ आयूम यांच्याकडे सुध्दा १२ क्विंटल धान्य आढळून आले. हे धान्य रेशनचा असल्याचा महसूल प्रशासनाला संशय आहे. तर इकडे भाजपातर्फे या रेशन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी केली आहे.

Exit mobile version