Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेशन दुकाने सुरूच राहणार ; अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) लोकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होणार असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. औषधे, दूध, अन्नधान्य पुरवठा करणारी दुकानांसह रेशन दुकाने देखील सुरुच राहतील, असे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी जाहीर केले आहे.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा थांबल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी, सर्व रेशन दुकाने सुरू राहणार असून जीवनावश्यक वस्‍तूंचा पुरवठा करण्याची आमची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आज ११६ वर पोहचली आहे.

Exit mobile version