Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे मालधक्का येथे दिवाळीनिमित्त ४५० परिवारांना फराळाचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी | रेल्वे मालधक्का येथे दिवाळीनिमित्त विविध सामाजिक संस्थांतर्फे ४५० परिवारांना फराळ वाटप करण्यात आले.

 

आज दि. ३ नोव्हेंबर रोजी सुरत रेल्वे गेट जवळील मालधक्का येथे साईबाबांची आरती करून रेल्वे माथाडी कामगार अध्यक्ष सागर सैदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत फराळ करण्यात आले. यावेळी ४५० परिवारांना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कामगार सचिव पंडित नाईक, कामगार उपाध्यक्ष राजू पटेल, माजी नगरसेवक संजय कोल्हे, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक दाभाडे, मी मराठी प्रतिष्ठान उपाध्यक्ष राहुल परकाळे, सामाजिक कार्यकर्ते कपिल ठाकूर, बापु ठाकरे, अतुल पवार, स्वप्नील बिर्ला, स्वप्नील परदेशी व सर्वे हुंडेकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी समाधान हटकर , शेरा कोळी, नितीन पाटील, राजू सपकाळे, दिनेश भालेराव, नरेंद्र सपकाळे आदींचे सहकार्य लाभले.

Exit mobile version