रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेतर्फे लसीकरण शिबीर(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | येथील रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेतर्फे माथाडी कामगारांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास १५०पेक्षा जास्त माथाडी कामगारांनी याचा लाभ घेतला.

 

मनपाचे शिवाजीनगर येथील डॉ. डी. बी. जैन रुग्णालय व रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचा संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले. माथाडी कामगारांना कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्याच्या  उद्देशाने रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेतर्फे लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.  हे लसीकरण डॉ. डी. बी. जैन रुग्णालयाच्या डॉ. सायली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जीएनएम उर्मिला भिरूड, एएनएम भारती पाटील, आशा सेविका मनीषा पवार यांच्या पथकाने केले. यशस्वीतेसाठी रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर सैदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू पटेल, पंडित पिरा नाईक, मधु रोकडे, शंकर ठाकूर, समाधान हटकर, मुकेश जाधव, अशोक जाधव, हुंडेकरी असोसिएशनचे सीताराम पोळ, मुकुंदा चौधरी, जितु पुरोहित व इतर कामगार संघटनांनी कामकाज पहिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/577942973294384

 

Protected Content