रेल्वे बोर्ड कमिटीसदस्यांच्या सुचनेनंतर खान्देश सेन्ट्रल मॉलकडील गेट झाले खुले

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय रेल्वे बोर्ड भारत सरकार PAC कमिटी सदस्यांनी जळगाव रेल्वे स्थानकाला आज भेट दिली. या भेटीदरम्यान समिती सदस्यांनी केलेल्या सुचनेनुसार खान्देश सेंटर मॉलकडील गेट काढण्यात येवून सर्वसामान्य नागरिकांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला.

 

आज भारतीय रेल्वे बोर्ड भारत सरकार PAC कमिटी सदस्यांनी जळगाव रेल्वे स्थानकास भेट दिली. या कमिटीत राजेंद्र फडके, छोटू भाऊ पाटील सुरत, कैलास वर्मा मुंबई, अभिलाश पांडे जबलपुर यांचा समावेश आहे. या कमिटी सदस्यांचे आमदार राजूमामा भोळे, भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी स्वागत केले. तसेच जळगाव रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत अडी अडचणी समिती सदस्यांना सांगितल्या. यासोबत उद्योजक, व्यापारी, प्रवासी संघटना यांनी आपल्या अडीअडचणी समिती समोर मांडल्या.

 

अखेर खान्देश सेन्ट्रल मॉलकडील  मार्ग झाला खुला

आमदार राजूमामा भोळे व दीपक सूर्यवंशी यांनी खान्देश सेन्ट्रल मॉल या भागाकडील गेल्या दीड ते दोन वर्षापासून मार्ग बंद असल्याने जेष्ठ नागरिक, दिव्यागं व सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देत हे गेट सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी कमिटी सदस्यांनी रेल्वे प्रशासनाशी तात्काळ चर्चा करुन सदरील खान्देश सेन्ट्रल मॉलकडील गेट सर्व सामान्य जनतेसाठी मोकळे करण्यात यावे अश्या सूचना दिल्या. सूचनेने रेल्वे प्रशासनाने तत्काळ पालन करून खान्देश सेन्ट्रल मॉलकडील गेट काढून नागरिकांसाठी मार्ग मोकळा केल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी व्यापार आघाडीचे अशोक राठी, भाजपा महिला सरचिटणीस रेखा वर्मा, अमित देशपांडे, प्रकाश पंडित व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी कमिटी सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले कि, जळगाव रेल्वे स्थानकांवर अजून एक खिडकी, वाढवण्यात आली आहे. त्यात दिव्यागं,व आमदार, खासदार यांच्यासाठी ही खिडकी असेल असे स्पष्ट केले.

 

Protected Content