Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेस्थानक परिसरात लॉकडाऊनचे उल्लंघन; चार जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जळगाव रेल्वे स्थानक परिसरात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानदारांवर शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना रात्री १० वाजेच्या आत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात सर्रासपणे रात्री उशीरा दुकाने सुरू होती. ही माहिती सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्याशी संपर्क साधून लॉकडाऊनचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तीन दुकानांवर कारवाई केली असून चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू मोरे यांच्या फिर्यादीवरून अशोक भागवत पद्मे (वय-३०) आणि सैय्यद हैदर अली (वय-६९) रा. शिवाजी नगर, भागवत कडूबा पाटील (वय-७०) रा. भोळे नगर असोदा जि.जळगाव आणि एहसान अली हैदर अली (वय-२०) रा. उमर कॉलनी जळगाव यांच्या विरूध्द भादवि कलम १८८ अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Exit mobile version