Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेस्थानक परिसरात कारण नसतांना तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानक परिसरात तरूणाला काहीही कारण नसतांना अज्ञात सात ते आठ जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार २२ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी रात्री उशीरात शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लक्ष वियज ठाकूर (वय-१८) रा. आसली गाव, उल्हास नगर हा तरूण सोमवारी २२ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आलेला होता. दरम्यान, शहरातील काही टवाळखोर सात ते आठ जणांनी काहीही कारण नसतांना तरूणाला बेदम मारहाण केली. या मारहाणी लक्ष ठाकूर याला तरूणाला दुखापत झाली. हल्लेखोरांना मारहाण करत जिवेठार मारण्याची देखील धमकी दिली. याबाबत तरूणाने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहे.

Exit mobile version