Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेस्थानक परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एकाचा ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नितिन ओंकार पांडे (वय-५०) रा. पिंप्राळा जळगाव हे कामाच्या निमित्ताने ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग समोर दुचाकी (एमएच १९ बीएच ३६७१) ने आले. दुचाकी पार्किंग करून कामानिमित्त बाहेर गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांची पार्किंगला लावलेली ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी नितीन पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

Exit mobile version