Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेच्या अपघातात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

 

चाळीसगाव, प्रतिनिधी न्यायडोंगरी ते हिरापुर डाऊन मध्य रेल्वे लाईन दरम्यान एका अज्ञात इसम रेल्वेचा धडकेत जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ७:०८ वाजताच्या सुमारास घडली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, न्यायडोंगरी ते हिरापुर डाऊन मध्य रेल्वे लाईन खांब क्र. ३१६/२९ दरम्यान रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात इसमाचे मृत्यू झाला आहे. हि घटना आज सकाळी ७:०८ वाजताच्या सुमारास घडली असून सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ह्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात स्टेशन मास्तर हिरापुर मध्य रेल्वे, चाळीसगाव यांनी फिर्याद दाखल केली आहे. ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ/२३४३ भालचंद्र पाटील हे करीत आहेत.

 

 

Exit mobile version