Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेकडून ४ हजार कोविड केअर कोच निर्मिती

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । रेल्वे मंत्रालयाने ६४ हजार बेडसह जवळपास ४ हजार कोविड केअर कोच राज्यांना वापरासाठी तयार केले आहेत. सध्या १६९ कोच विविध राज्यांकडे सोपवण्यात आले आहेत. अशा माहिती देण्यात आली आहे.

 

भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आहे. दररोज लाखांच्या संख्येत बाधित आढळून येत आहेत. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, रेमडेसिविर व लसींचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आल्याचे दिसत आहे.

 

राज्यांच्या मागणीनुसार रेल्वेने नागपूर, भोपाळ, इंदौरजवळील तिहीसाठी कोविड केअर कोच तयार केले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर आणि नागपूर महापालिका आयुक्त यांच्यात ११ कोविड केअर कोचसाठी सामंजस्य करार झाला आहे. अशी देखील माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली .

 

 

सद्यस्थितीस रेल्वे विभागाकडे १६ झोनमध्ये ४ हजार २ डब्बे कोरोना रुग्णांसाठी सज्ज आहेत. राज्य सरकारने या कोविड केअर कोचची मागणी केली, तर ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती या अगोदर देण्यात आली होती.

 

कोविड केअर कोचमध्ये रेल्वेकडून रूग्णांच्या सुविधेसाठी अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कुलर, ऑक्सिजन सिलिंडर आदींचा यामध्ये समावेश आहे.

 

पश्चिम रेल्वेकडे ३८६ आयसोलेशन कोच उपलब्ध असून, त्यापैकी १२८ कोच हे मुंबई विभागात आहेत. एखाद्या राज्याने या आयसोलेशन कोचची मागणी नोंदवल्यास, हे कोच त्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यास तयार असतील. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओकडून देण्यात आली होती.

Exit mobile version