Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई – डीवायएसपी वाघचौरे

 

 

भुसावळ : प्रतिनिधी । साकेगाव येथून वाघूर नदी पात्रातील रेती चोरून डंपर भरून चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मिळल्यावर हुडको कॉलनी, मिरची ग्राउंड भुसावळजवळ रेतीने भरलेल्या वाहनास पकडून कारवाई केल्याने चोरटी वाहतूक करणाऱ्यांची धावपळ झाली.

भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने मोटरसायकल स्वारांना धडक दिल्याने दाम्पत्य व तरुणाचे निधन झाले शहरातील अपघातांचे प्रमाण वाढू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी गौण खनिज चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

फिर्यादी पोकॉ संकेत झांबरे नेमणूक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाघूर नदी पात्रातील रेती चोरून डंपर भरून चोरटी वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मिळल्यावरून भुसावळ शहरातील हुडको कॉलनी,मिरची ग्राउंड भुसावळ जवळ संकेत झांबरे व विशाल सपकाळे यांनी जाऊन डंपर (क्र एम.एच.१९ झेड ३५१३) मध्ये ७,००० रुपये किंमतीची रेती भरून चोरटी वाहतून करतांना मिळून आले म्हणून आरोपी शिवदास कोळी, जयवंत कोळी , कृष्णा कोळी ( रा – साकेगाव) यांचे विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ९८५/२०२० भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version