Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी रेकॉर्डवरील असलेला गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली वय 20 रा. तांबापुरा याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी चोरीचे गुन्हे व एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी रविवार १२ फेब्रुवारी रोजी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

तांबापुरा येथे सादिन शब्बीर पटेल यांचे बंद घर फोडून ५० हजार रुपयांची रोकड लांबवील्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी घडली होती. हे घरफोडी इश्तीयाक याने केल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी त्याला तांबापुरा परिसरातून 3 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्याच्याकडून चोरीचे पन्नास हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे .त्यांनतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

खेडी रोड परिसरातील दुचाकी इश्तीयाक यानेच चोरल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वर्ग केले. यादरम्यान चौकशीत त्याच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील एका दुचाकी चोरी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांनतर इश्तीयाक अली यास ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद सिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे , किशोर पाटील, इमरान सय्यद, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी, किरण पाटील, मुकेश पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी ही कारवाई केली आहे.

Exit mobile version