Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रुग्णवाहिका दर आकारणीची परिवहन खात्याची कडक भूमिका

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  कोरोनाकाळात रुग्णवाहिकाचे अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. तक्रारी येत असल्याने रुग्णवाहिकांसाठी निश्चिात केलेले भाडेदर आकारा, अन्यथा कारवाई के ली जाईल असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे

 

. विभागाने निश्चिात केलेले दरपत्रकही रुग्णवाहिकांना लावण्याचा उपक्रम राज्यात आरटीओकडून राबविला जात आहे.

 

रुग्णवाहिकांच्या विविध प्रकारांनुसार २५ किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक, तसेच दोन तासांच्या वापराकरिता किंवा प्रतिकिलोमीटर दराने भाडे निश्चिात के लेले आहे. परंतु सध्या रुग्णवाहिका चालक, मालक निश्चिात केलेल्या भाडेदरांपेक्षा जास्त दर आकारणी करुन रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत   असल्याचे  दिसून येत आहे. अशांवर कारवाई करण्याचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

 

जे वाहन चालक, मालक जास्त भाडेदर आकारणी करतील, त्यांची  तक्रार आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल किंवा गुन्हा दाखल केला जाणार आहे. पहिल्या गुन्ह््यात ५ हजारांपर्यंत, दुसऱ्या गुन्ह््यात दहा हजारांपर्यंत दंड आकारला जाईल. तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.भाडेदरपत्रक आतील बाजूने प्रदर्शित करणे चालक, मालकास बंधनकारकही आहे. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी रुग्णवाहिकांच्या दरांविषयी असलेल्या तक्रारींमुळे चालक व वाहकांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले

Exit mobile version