रिव्हर्स घेणाऱ्या कारला दुसऱ्या भरधाव कारची धडक, दोन्ही कारचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका भरधाव कारने रिव्हर्स घेत असलेल्या दुसऱ्या एका कारला धडक दिल्याने दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील हॉटेल राज गार्डन समोर हा अपघात झाला. या अपघातप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरुन दोन्ही कारचालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील शिरसोली रोडवर हॉटेल राज गार्डन आहे. या ठिकाणी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत यु.के.९६१७ या क्रमाकांच्या कारवरील चालक कार रिव्हर्स घेत होता, याचदरम्यान याठिकाणी भरधाव जाणाऱ्या एम.एच.०२ डी.जे.६८८४ या क्रमाकांच्या कारने रिव्हर्स येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या दोन्ही कारचे नुकसान झाले. या अपघातास दोन्ही कारचालक हे स्वत: जबाबदार असल्याने याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शुध्दोधन ढवळे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्हीही कारवरील चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहेत.

Protected Content