Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिया , शौविकला जामीन नाकारला

मुंबई  वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मृत्युपूर्वी अमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपामुळे अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक या दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.
रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्या. जी. बी. गुरव यांनी चक्रवर्ती भावंडांची आणि पोलिसांची बाजू ऐकल्यावर सुनावणी शुक्रवारी ठेवली. अटकेत असलेल्या अन्य आरोपींच्या जामिनावरही सुनावणी झाली. या सगळ्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आज सुनावणी पूर्ण केली.
२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

Exit mobile version