Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘रिपब्लिक’च्या वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांना अटक

मुंबई: वृत्तसंस्था । टीआरपी घोटाळ्यात . रिपब्लिक टीव्हीशी संबंधित पहिलीच अटक झाली आहे. ‘रिपब्लिक’च्या वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

आता रिपब्लिकच्या अडचणींत भर पडली आहे. एकूण अटक आरोपींची संख्या आता १२ वर पोहोचली आहे. थेट सहभाग दिसून आल्याने रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ झाली आहे, असे सांगितले जात आहे.

टीआरपी घोटाळ्यात यापूर्वी ११ जणांना अटक करण्यात आली होती. आधी अटक करण्यात आलेल्या कोळावडे याने रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी लाखो रुपये दिल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली होती. पोलिसांनी अभिषेक याच्या घराची आणि आशिष चौधरी याच्या पोखरण येथील ऑफिसमध्ये झाडाझडती घेतली होती.

Exit mobile version