रिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण

जळगाव प्रतिनिधी । जागतिक कन्या दिनानिमित्त रिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका ज्योती तायडे यांच्याहस्ते वृक्षारोपण केले.

यावेळी जानवी फाउंडेशनच्या अध्यक्षा व अखिल भारतीय राजश्री शाहू महिला ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष चित्रा मालपाणी, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अखिल भारतीय राजश्री शाहू ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन सैंदाणे, जिल्हाध्यक्षा हर्षाली पाटील, संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा तापडिया यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत पल्लवी इंदानी यांनी केले. याकार्यक्रमास दाणा बाजारातील रहिवासी कीर्ती राणा, पद्मावती राणा, सचिन राणा, योगेश पानवाला, सतीश दायमा, पुनमचंद दायमा, जितेंद्र इंदानी, सुरज राणा, सिद्धार्थ राणा, जानवी मालपाणी, रिद्धी मालपाणी आणि आकाश इंदानी आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content