रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कोणतेही बदल नाहीत !

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पतधोरण आज जाहीर केले. यावेळी रेपो दर रिझर्व्ह बँकेने कायम ठेवले आहेत. रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्क्यांवरच कायम ठेवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.

 

गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आर्थिक धोरण समितीने (एमपीसी) रेपो दर ४ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे दास म्हणाले. याशिवाय रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट ४.२५ टक्के आणि बँके रेट ४.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोना लॉकडाऊन काळात कर्जासाठी दिलेला ईएमआय दिलासा सुरू ठेवण्याबाबत किंवा त्यावर अन्य काही दिलासा देण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र आजच्या बैठकीत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे इएमआय दिलासा मिळण्याचा कालावधी ३१ ऑगस्टला संपणार आहे. बँकांनीही या मुदतवाढीचा गैरफायदा घेण्याची शक्यता वर्तविली होती. यामुळे अद्याप यावर निर्णय घेतला नसल्याचे समजते.

Protected Content