Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिक्षा चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; एकाचे मोडले कमरेचे हाड !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत रिक्षा चालकाचा उजव्या पायाच्यावर कमरेजवळ हाड मोडले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर येथे हिरामण काशीराम बोरसे वय ७० हे राहतात. ते रिक्षा चालक आहेत, हिरामण बोरसे हे 31 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता इच्छा देवी चौकात गेले होते. यादरम्यान एका रिक्षा चालकाने हिरामण बोरसे यांना या एका रिक्षा चालकाने शिवीगाळ करत चापटाबुक्यानी मारहाण केली. या झटापटीत खाली पडल्याने हिरामण बोरसे यांना उजव्या पायाच्या बाजूने कमरेजवळ हाड फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी उपचारानंतर हिरामण बोरसे यांनी गुरुवार २ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावरून एम.एच. 19 व्ही.2520 या क्रमांकाच्या रीक्षावरील बबलू पूर्ण नाव माहीत नाही, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Exit mobile version