Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिंगरोडवरील शासकीय दवाखाना त्वरीत सुरू करण्याची मागणी (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रिंगरोडवर बांधलेला दवाखाना तातडीने सुरू करण्याची मागणी भुसावळचे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवदत्त नगर, रिंगरोड येथे शासनाच्या निधीतून एक रूग्णालय बांधण्यात आले आहे. परंतू कोरोनाच्या या महामारीत प्रभागातील नागरिकांना लहान लहान आजारांसाठी भटकंती करावी लागत आहे. आणि पालिकेच्या दावाखाना परिसरातील नागरीकांसाठी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने गोरगरीब जनतेला येणे होत नाही. प्रभागातील शिवदत्त नगर, गर्जर कॉल्नी, १५ बंगला, लकिमा नगर, संभाजी कॉलनी, लक्ष्मी नगर, गोपाळ नगरे, गांधी नगर, पालक नगर, गुंजाळ कॉलनी, लक्ष्मी नगर, गोपाळ नगर, बजरंग कॉलनी, खडका चौफुलीचा भाग ह्या भागातील नागरिकांना त्या रूग्णालयाचे मो्ठया प्रमाणावर फायदा होणार आहे. तरी लवकरात लवकर हे रूग्णालय सुरू करावे या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी आमदार संजय सावकारे यांना दिले आहे.

Exit mobile version