रा. का. मिश्र विद्यामंदिर येथे लसीकरण

पारोळा, प्रतिनिधी |तालुक्यातील बहादरपूर येथील रा. का. मिश्र विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाद्वारे कोरोना प्रतिबंध लसीकरण करण्यात आले.

 

शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सुनील पारोचे व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण केले. प्रथम डॉ. पारोचे यांचे श्रीफळ रुमाल देऊन स्वागत प्राचार्य एम. पी. शिवदे सरांनी केले तर डॉ.तुषार पाटील यांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. एस. चौधरी यांनी केला. नंतर लसीकरणाचे महत्व विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक आर. पी. बडगुजर यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती व न्यूनगंड दूर केला. तर प्राचार्य एम. पी. शिवदे यांनी डॉक्टरांचा परिचय करून दिला. पथकामध्ये डॉ.तुषार पाटील, समुदाय पथक प्रमुख प्रमिला ईशी, सहाय्यक आर. टी. सरदार, सहाय्यक अभिमन जाधव, सहाय्यक तुषार महाले, सहाय्यक श्री बागुल डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पथकातील सदस्य व डॉक्टरांनी १८० विद्यार्थ्यांचे लसीकरण केले. पथकातील सदस्यांचे आभार ज्येष्ठ विज्ञान शिक्षक एस. बी. चौधरी यांनी मानले. वरील संपूर्ण कार्यासाठी विद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content