राहूल गांधी यांनी वक्तव्य केल्याचा निषेधार्थ भाजयुमोतर्फे शाईफेक आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत जोडो यात्रेत जाहीर सभेत राहूल गांधी यांनी स्वातंत्र्य विर सावरकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले. राहूल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने गुरूवारी १७ नोव्हेंबर रोजी शास्त्री टॉवर चौकात निषेध आंदोलन करून राहूल गांधी यांच्या प्रतिमेला शाई फेक आंदोलन केले.

राहुल गांधी यांनी हिंगोलीत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांवरविषयी वादग्रस्त विधानं केली होती. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, ते इंग्रजांसाठी काँग्रेसविरोधात काम करायचे, त्यांनी दुसऱ्या नावानं स्वत:वरच पुस्तक लिहिलं आणि अंदमानातून सुटका होण्यासाठी त्यांनी इंग्रजांची माफी मागितली असे वादग्रस्त आरोप राहुल यांनी केले. त्यामुळं महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने गुरूवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता शास्त्री टॉवर चौकात आंदोलन करण्यात येवून राहूल गांधी यांच्या प्रतिमेवर शाई फेकून निषेध नोंदविण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहायला निघालेले राहुल गांधी यांना देशाचा इतिहास माहिती नाही, स्वातंत्र्य विर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करून प्रसिध्दीच्या झोतात येण्याचे काम राहूल गांधी करत आहे. विर सावरकरांनी काय केलं याचा राहूल गांधी यांनी करावा, ते जर इंग्रजांना मदत करत होते तर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली नसती असे सांगितले. याप्रसंगी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, नगरसेविका शुचीता हाडा, नगरसेविका दीपमाला काळे, सरचिटणीस विशालजी त्रिपाठी, आनंद सपकाळे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, नगरसेवक राजू मराठे, जितेंद्र मराठे, गायत्री राणे, किशोर चौधरी, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content