Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहुल गांधी यांनी मोदींना पुन्हा घेरले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत टीका केली . पंतप्रधान मोदींसाठी ८४०० रुपये खर्चुन आलीशान विमान मागवलं जात आहे आणि जवानांना विना बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी सीमेवर पाठवलं जात आहे, असं त्यांनी म्हटलंय.

हा न्याय आहे का?’ असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. या व्हिडिओत एका ट्रकमध्ये जवान बसलेले व एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये एक जवान म्हणताना दिसतोय की, ‘नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आपल्या जीवासोबत खेळलं जातंय’.

राहुल गांधी सतत चीन आणि भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांना मिळणाऱ्या सुविधांना अधोरेखित करत आहेत दोन दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधानांनी आपल्यासाठी ८४०० कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. गरम कपडे ३० लाख, जॅकेट-ग्लोव्ह्ज ६० लाख, बुटं ६७ लाख २० हजार, ऑक्सिजन सिलिंडर १६ लाख ८० हजार… पंतप्रधानांना केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही’ असं ट्विट करत पंतप्रधानांवर आणि मोदी सरकारवर टीका केली होती.

Exit mobile version