Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रास्ता रोकोच्या प्रयत्नातील मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात (व्हिडिओ)

जळगाव राहूल शिरसाळे । हिताची कंपनीतील कामगारांना कायम करावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनाच्या प्रयत्नात असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले 

 

कामगारांना लवकरात लवकर कायमस्वरूपी कामावर घेण्यासह विविध मागण्यांसाठी हिताची ऑटोमोबाइल सिस्टम लिमिटेड कंपनीच्या निषेधार्थ मनसेचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वात कामगारांनी  बांभोरी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतू पाळधी पोलीसांनी  दखल घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.  हिताची ऑटोमोबाइल सिस्टम लिमिटेड कंपनीने जळगाव कामगार आयुक्तांनी आदेश देऊन देखील एका कामगाराला पुन्हा नोकरीत न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रस्ता आस्थापना विभागातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी कंपनी व्यवस्थापना विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलक हिताची कंपनीजवळून महामार्गाकडे येत असतांना पोलिसांनी त्यांना अडविल्याने रास्तारोको आंदोलन होऊ शकले नाही. कंत्राटी कामगार नरेंद्र मानसिंग पाटील यास काही एक कारण नसतांना कामावरून काढून टाकले आहे. यास पुन्हा कामावर घेण्यात यावेत यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येत असल्याचे राजेंद्र निकम यांनी सांगितले.

 

 

Exit mobile version