Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद कडून जळगाव कडे येत असताना सरस्वती फोर्ड शोरूमसमोर कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध जखमी झाल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अज्ञात कारचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील नशिराबाद शहरातील बारदरी मोहल्ला येथे सुलतान शेख उस्मान (वय-६०) हे राहतात. ते रविवारी १७ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या (एमएच १९  बीडी ४८७१) या क्रमांकाच्या दुचाकीने नशिराबादकडून जळगावकडे जात होते. यादरम्यान महामार्गावरील सरस्वती फोर्ड शोरूम समोर (एमएच ०५ सीए १६५२) या क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील सुलतान शेख हे खाली पडले त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली तसेच दुचाकीचे ही नुकसान झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी सुलतान शेख यांचा नातू शेख जावेद शेख आसिफ याने दिलेल्या तक्रारीवरून रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात कारचालक विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version