Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘राष्ट्रीय बंजारा रत्न’ पुरस्कारासाठी अशोक राठोड यांची निवड

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांची ‘राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कारा’साठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र देखील त्यांना प्राप्त झाला आहे.

धर्मगुरू तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन (भारत) यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित ‘राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार’ वितरणाचे कार्यक्रम तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे ११ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या देशातील २१ जनांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात चाळीसगाव येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांची निवड करण्यात आली असून राज्यातून समाजातील ते एकमेव आहे. ज्यांची निवड झाली आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तत्पूर्वी अशोक राठोड हे संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करीत असतात. गरजूंना कपड्या वाटप, किराणा कीट वाटप यांच्यासह दिनदुबळ्यांसाठी स्वतःला वाहून घेत असतात. त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे पंचक्रोशीतून बोलले जात आहे. तत्पूर्वी त्यांच्या निवडीने तालुक्यासह ओढरे गाव ढवळून निघाला आहे. दरम्यान सदर पुरस्कार मिळणार असल्याचा विलक्षण आनंद असून अजून सामाजिक कार्याचा भार खांद्यावर पडणार आहे. त्यामुळे या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणार असल्याचे अशोक राठोड यांनी सांगितले आहे.

Exit mobile version