Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत विधवांना आमदार पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप

 

पाचोरा, प्रतिनिधी । शासनाच्या महाराजस्य उपक्रमार्गात एकाच छताखाली विविध योजनांचे लाभार्थ्यांना तहसीलदार कार्यालय येथे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत २१ विधवा भगिनींना धनादेशाचे तसेच ५ व्यक्तींना रेशनकार्डचे वाटप आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार, तलाठी, अधिकारी व कमर्चारी वर्ग यांच्या वर्गणीतून नगरपालिका सफाई कर्मचारीवर्गाना टी शर्ट, टोपी, बूट अशा स्वरुपाचे किट्स वाटप करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आमदार किशोर पाटील सांगितले की, विधवा भगिनींच्या दुःखांत मी सहभागी आहे. आपला आधार गेला म्हणून शासनाच्या माध्यमाने जी अल्पशी मदत देऊ केली तिचा उपयोग आपल्या संसारासाठी करावा. तहसील कार्यालय, पाचोरा यांच्या माध्यमाने जी मदत सफाई कामगारांना केली त्याबद्दल मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना सहजपणे देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाने सतत कार्यरत राहावे. भविष्यात कोरोना होऊ नये याकरिता मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत, सुरक्षित अंतर राखावे हीच कोरोना लस आहे असे समजावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यावेळी उपविभागीय अधिकारी, पाचोरा राजेंद्र कचरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसिलदार कैलास चावडे, गणेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, सचिन सोमवंशी, राजेंद्र पाटील, नाना वाघ, आदी मान्यवर तथा कर्मचारी वर्ग, लाभार्थी बंधू , भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार कैलास चावडे यांनी केले. तर सुत्रसंचलन आर. डी. पाटील यांनी केले.

Exit mobile version