Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय आरोग्य अभियानार्तगत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Heart attack1

जळगाव प्रतिनिधी । येथील गोदावरी फाऊंडेशन व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोबाईल मेडीकल युनिटच्या सयुक्त विद्यमाने फेब्रुवारी महिन्यात मोफत आरोग्य शिबिरास सुरूवात करण्यात आली.

रावेर तालुक्यातील नेहता, खिरवड येथून काल ३ रोजी शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे. ४ रोजी पुरी, गोलवाडे, ५ रोजी भांबलवाडी, शिंगाडी, ६ रोजी मराठे, ७ रोजी गौऱ्‍यापाडा अंगलवाडी, उत्तमनगर, ८ रोजी मालापूर, विणापूर, १० रोजी पांढरी, शेवरी, चांदण्यातलाव, ११ रोजी मन्यावस्ती, धुममापवाडा, १२ रोजी बोरमळी, शेणपाणी १३ रोजी तिडया आधारमळी, १४ रोजी ताडजिन्सी, आंभोडा खु, १५ रोजी मोहंगण, पिप्री, निरूड, १७ रोजी कोळंबे, सुतवाडी, १८ रोजी जानोरी, चिंचाटी, १९ रोजी चारमळी, बोरमळी पाडा, २० रोजी हलखेडा, लालगोटा, २२ रोजी मोरझिरा, मधापुरी, २४ रोजी टाकळी, वायला, नांदवेल, २५ रोजी डोगरदेपाडा, २६ रोजी पिप्रीकुड, गारखेडा, काशाचापाडा, २७ रोजी सावदा, २८ रोजी गाडऱ्‍या, जामन्या, उसमळी इ ठीकाणी शिबिर घेतले जाणार आहे. सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत तज्ञ डॉक्टर तपासणीसाठी हजर राहणार असून रूग्णांना आवश्यकता भासल्यास मोफत औषधी वाटप केले जाणार आहे.तसेच जागेवरच तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version