Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची तालुका कार्यकारीणी घोषित

जामनेर प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची ओ.बी.सी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, राजु नाईक, माधव चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, विनोद माळी, प्रभु झाल्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. सामाजिक न्याय विभागाचे जामनेर तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती प्रमाणपत्र पदाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी नेमाडे यांनी पक्ष संघटन मजबूत करून वंचितांना या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी त्या धर्तीवर कार्य करण्याचे आवाहन नवीन नियुक्त कार्यकारिणीला बोलताना केले. नवनियुक्त पदाधिकारी यांचे संजय गरूड यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version