Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे पंतप्रधानांना गोवऱ्या भेट (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी  । केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी जळगाव महानगर राष्ट्रवादी पार्टी महिला आघाडीतर्फे जिल्हा महानगर अध्यक्षा मंगला  पाटील यांच्या नेतृत्वाखाली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने गोवऱ्या पाठविण्यात आल्यात. 

 

महिला आघाडी शहराध्यक्ष मंगला पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढ विरोधात मुख्य पोस्ट कार्यलयात आंदोलन  करण्यात आले.  यावेळी केंद्र शासनाचा निषेध म्हणून पोस्ट टपालने प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांना गावऱ्या  पाठविण्यात आल्यात.  सामान्य जनतेची हाक झोपलेल्या  केंद्र शासनापर्यंत पोहचविण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे  जिल्हा महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांनी सांगितले.   गॅस सिलेंडरच्या किमतीत सतत होणाऱ्या भाववाढ विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले.  याप्रसंगी सलीमभाई इनामदार,  वाय, एस . महाजन सर,  सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष प्रतिभा शिरसाठ ,अर्बन सेल अध्यक्ष अश्र्विनी देशमुख ,  युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील , सुमनबाई बनसोडे,  सीमा राॅय,  आशा येवले, मिनाक्षी चव्हाण, सीमा गोसावी, पूजा पाटील,  पुष्पा पाटील, मिनाक्षी शेजवलकर, पूजा नन्वरे सौ. नेवे,   व सौ.अग्रवालताई उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version