Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने सुप्रीम कॉलनी परिसरात सभासद नोंदणी

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे सभासद नोंदणी, व महिलांचे विविध प्रश्नावर विचार विनिमय सभा घेण्यात येवून महिलांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

 

जिल्हा महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कॉलनी (वॉर्ड क्रमांक, १९) मध्ये परिसरातील महिलांची बैठक शनिवार दि. २२ जानेवारी रोजी घेण्यात आली. यावेळी महानगर सरचिटणीस रुपाली पाटील, अॅड. सचिन पाटील, सीमा गोसावी, प्रभाग प्रमुख,अॅड. सुरेश पाटील, अॅड. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे बाबत , पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार , खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिलांबाबत केलेले कार्याबद्दल माहिती देण्यात आली. यासोबत परिसरातील नागरिकांची विविध दैनंदिन समस्यां जाणून घेण्यात आली. व भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी मदतीसाठी नेहमीच तत्पर राहील अशी ग्वाही मंगला पाटील यांनी यावेळी दिली. याप्रसंगी ४० महिलांनी आपली सभासद नोंदणी केली. यावेळी परिसरतील अक्काबाई गवळी, सुरेखा महाजन, प्रतिभा गवळी, लताबाई कोळी, शुभांगी महाजन, अशा असंख्य महिलांची उउपस्थिती होत्या.

Exit mobile version