Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी पक्षातर्फे मौलाना आझाद यांना अभिवादन

 

जळगाव प्रतिनिधी । मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.  त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  पहिले जळगाव जिल्हाध्यक्ष स्व. विश्वनाथ भाऊ इंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. जी. महाजन सर मीनाक्षी चव्हाण यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या भरीव कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा सेक्रेटरी अशोक पाटील, सलीम इनामदार, डॉ. रिज़वान खटीक, ममता तडवी, जुलेखा शाह, पीनाज़ फनिबन्दा, लता पाटील, उज्वला शिंदे,  रोहन, गणेश निंबाळकर, संजय चौहाण, अशोक लाड़वंजारी, अरविंद बंगाली, सुनील माळी, दिलीप महेश्वरी, जॉन अन्थोनी, जय प्रकाश महाडीक आदी उपस्थित होते.  

 

Exit mobile version